Ad will apear here
Next
जर्मन तज्ज्ञांचे ‘डीकेटीई’मध्ये मार्गदर्शन


इचलकरंजी : जर्मन वस्त्रोद्योगातील तब्बल ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारे तज्ज्ञ रॉल्फ मुलर व श्री. शेफर यांनी ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाइल अँड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमधील टेक्स्टाइलच्या विद्यार्थ्यांना एका महिना कालावधीसाठी अद्ययावत प्रशिक्षण दिले. त्यांच्या या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांसोबत, प्राध्यापक व स्टाफ यांनाही झाला. जर्मन सरकारच्या योजनेअंतर्गत एक महिन्याच्या कालावधीत त्यांनी विविध वस्त्रोद्यागातील विषयावर विद्यार्थ्याना व्याख्यान दिले. मागील वर्षीही मुलर यांनी विद्यार्थ्यांना एक महिना प्रशिक्षण दिले होते.

या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी ‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील होत असलेले तंत्रज्ञानातील बदल, जर्मन टेक्स्टाइल इंडस्ट्रीज, तेथील सद्यस्थिती, भविष्यातील वस्त्रोद्योगाची वाटचाल व जर्मनमधील करिअर संधी आदी अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. मुलर व शेफर यांना जर्मनीतील विविध नामांकित टेक्स्टाइल ऑर्गनायझेशनमध्ये सिनिअर एक्स्पर्ट या पदावरचा अनुभव आहे.

मुलर यांना टेक्स्टाइल प्रोसेसिंग, डायिंग, फिनींशिंग टेक्नॉलॉजी, प्रिंटिंग, प्रोडक्शन, न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट, टेक्स्टाइल टेस्टिंग यामधील अनुभव आहे. फॅन्सी यार्न मॅन्युफॅक्चरिंग, मॅन मेड प्रोडक्शन, केमिकल टेस्टिंग आदी  टेक्स्टाइलच्या विषयावर त्यांचा हातखंडा आहे.  

शेफर यांना निटिंग विषयामधील प्रदीर्घ अनुभव आहे.  त्यांनी निटिंग, सॉक्स निटिंग व मेडिकल सॉक्स अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी अमेरिका, चायना, इटली, इथोपिया अशा विविध देशांना भेटी दिल्या आहेत. प्रशिक्षणकालावधीमध्ये त्यांनी प्रथम ते अंतिम वर्ष टेक्स्टाइल पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षण संपादन करीत असलेल्या विद्यार्थ्यांना लेक्चरच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.  

याविषयी बोलताना टेक्स्टाइल केमिस्ट्रीच्या अंतिम वर्षात शिकणारा कौशल शाह म्हणाला, ‘डीकेटीईमध्ये बऱ्याच जर्मनमेड मशिनरीवर आम्ही प्रात्यक्षिक करीत असतो. त्यामुळे आमच्या शंकेचे निरसन करण्यासाठी आम्ही जर्मन तज्ज्ञांशी संवाद साधला व त्यांनी आम्हाला विस्तृतपणे मार्गदर्शन केले.’
 
टेक्स्टाइल प्लॅंट इंजिनीअरिंगच्या तृतीय वर्षात शिकणारी आराधना कांबळे म्हणाली, ‘जर्मन तज्ज्ञांच्या ज्ञानाचा व मार्गदर्शनाचा उपयोग आम्हाला आमचे वस्त्रोद्योगातील ज्ञान वाढवण्यासाठी झाला आहे व त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साही वातावरण आहे. या तज्ज्ञांनी आम्हा विद्यार्थ्यांशी ‘जर्मन लँग्वेज कोर्स’ या विषयावार देखील संवाद साधला व याचा उपयोग भविष्यकाळात आम्हाला इंटरनॅशनल प्लेसमेंटसाठी होणार आहे.’  

यापूर्वीही जर्मनीतील नामांकित विद्यापीठ व अनेक इंडस्ट्रीजनी ‘डीकेटीई’शी करार केला आहे. ‘डीकेटीई’ जर्मन देशातील विविध टेक्स्टाइलच्या एक्झिशेनमध्ये सहभाग घेण्यात अग्रेसर आहे. ‘डीकेटीई’च्या १५ हून अधिक प्राध्यापकांनी जर्मन येथील इंडस्ट्रीज व इन्स्टिट्यूटना भेटी दिल्या असून, त्यांनीही जर्मनीतील विद्यापीठामध्ये लेक्चरच्या माध्यमातून परदेशातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
 
‘डीकेटीई’साठी जर्मनीत सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देत येथील अनुभव अविस्मरणीय असल्याचे या दोन्ही तज्ज्ञांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, सर्व ट्रस्टी यांनी मुलर व शेफर यांचे इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत केले. हे प्रशिक्षण राबविण्यासाठी ‘डीकेटीई’चे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. यासाठी समन्वयक म्हणून प्रा. ए. यू. अवसरे, प्रा. एम. एस. कुलकर्णी व प्रा. आर. एच. देशपांडे यांनी काम पाहिले.
‘डीकेटीई’तील विद्यार्थ्यांना अद्ययावत प्रशिक्षण देताना  जर्मनीचे वस्त्रोद्योगातील तज्ज्ञ रॉल्फ मुलर व शेफर

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZQMBQ
Similar Posts
‘डीकेटीई’ला ‘बेस्ट ट्रेनिंग अ‍ॅंड प्लेसमेंट’ पुरस्कार प्रदान इचलकरंजी : येथील वस्त्रोद्योग आणि अभियांत्रिकी तसेच व्यवस्थापनशास्त्राचे अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या ‘डीकेटीई’ संस्थेला वर्ल्ड एज्युकेशन समिटमध्ये बेस्ट प्लेसमेंट अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार ‘डीकेटीई’च्या वतीने एमबीए विभागप्रमुख प्रा. एस. आर. पाटील यांनी डॉ. रवी गुप्ता आणि कमिशनर डॉ
‘डीकेटीई’चा ‘हॅपेसेन-व्हिएतनाम’शी सामंजस्य करार इचलकरंजी : विद्यार्थी कल्याणासाठी व उद्योजकतेला देण्याच्या हेतूने डीकेटीईचा व्हिएतनाम देशातील हॅपेसेन या कंपनीशी सामंजस्य करार झाला आहे. या करारांतर्गत व्हिएतनाममधील विद्यार्थ्यांना या कंपनीच्या माध्यमातून डीकेटीईमध्ये सुरू असलेल्या फॉरेन कोट्याअंतर्गत शिक्षण पूर्ण करता येणार आहे.
रेसिंग चॅंपियनशिपमध्ये ‘डीकेटीई’चा संघ द्वितीय इचलकरंजी : ‘डीकेटीई’च्या टेक्सटाईल अँण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या ड्रिफ्टर्स संघाने ‘राष्ट्रीय अ‍ॅटो इंडिया रेसिंग चॅंपियनशिप २०१८’ स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. विविध राज्यांतील सुमारे ७०हून अधिक संघानी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता
‘जागतिक शैक्षणिक गुणवत्तेत ‘डीकेटीई’ अव्वल’ इचलकरंजी : ‘आधुनिक डिजिटलायझेशन युगात ‘डीकेटीई’ने शैक्षणिक क्षेत्रात दिलेली सेवा, संशोधन व विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर केलेले शैक्षणिक कार्य यांमुळे आज ‘डीकेटीई’चा ब्रँड अधोरेखीत होत आहे,’ असे गौरवोद्गार ‘किर्लोस्कर-टोयाटा’चे सीओओ कॅनिचरो कॅम्बे यांनी काढले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language